कोल्हापूर करवीर निवासानी महालक्ष्मी नगरीमध्ये, शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने, पंचगंगा नदीच्या सान्निध्यात, शिवाजी पूल पासून दहा किलोमीटर अंतरावर, पन्हाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आणि जोतीबाच्या कुशीत असणाऱ्या केर्ले गावात 13 मार्च २००९ साली एक नवीन संकल्प नवीन विचार मनात आला आणि तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शुद्ध बियाणे सशक्त व निरोगी रोपांसाठी आणि योग्य सल्ल्यासाठी आनंदीमंगल रोपवाटीकेची स्थापना केली.
सुरुवातीला तीन गुंठे क्षेत्रापासून झाली त्यानंतर आज पर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास व आशीर्वादाने अत्याधुनिक पद्धतीने दोन एकर क्षेत्रावर आपली रोपवाटिका उभी आहे. येथून पुढेही नवनवीन, आधुनिक पद्धतीने आपली रोपवाटिका वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न चालू राहील. शेतकऱ्यांना आधुनिक शेती, सेंद्रीय शेती ,चांगली सेवा, शुद्ध व निरोगी रोपे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांची प्रगती आणि सुमृद्धी व्हावी हेच आमचे ध्येय आहे.
कामगारानं विषयी :
आमच्याकडे 25 ते 30 कामगार कामावरती असतात बियाणी टाकण्यापासून, रोपे डिलिव्हरी देण्यापर्यंत सर्व कामे अगदी प्रामाणिकपणे ही करत असतात रोपवाटिका व शेतकर्यांमधील त्यांना दुवा म्हणण्यास हरकत नाही. एखादा व्यवसाय कुणी एकटा माणूस मोठा करत नसून त्यांच्याकडे असणाऱ्या कामगारांच्या जोरावर आणि विश्वासावर होत असतो असे आम्हाला वाटते बाजारांमध्ये येणारे नवनवीन तंत्रज्ञान माहिती आम्ही त्यांना वेळोवेळी देत असतो.